Search This Blog

Friday, 10 February 2023

जिल्ह्यातील युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी

 

जिल्ह्यातील युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी

Ø चंद्रपूर, सावली, राजुरा व ब्रह्मपुरी आयटीआयमध्ये कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. 10 : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच त्यांच्या कौशल्य विकास संधीमुळे त्यांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त होण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर सावली, राजुरा व ब्रह्मपुरी येथे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील युवकांकरीता विविध प्रकारचे प्रशिक्षण व कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेशाकरीता युवकांनी संबंधित प्रशिक्षण संस्थेशी संपर्क साधून मोफत कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे. 

००००००


No comments:

Post a Comment