राज्यस्तरीय शालेय बॉक्सींग क्रीडा स्पर्धेचे भद्रावती येथे उद्घाटन
चंद्रपूर, दि. 8 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, व चंद्रपूर जिल्हा बॉक्सींग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय (14 वर्ष मुले व 17 वर्ष मुले/मुली) बॉक्सींग क्रीडा स्पर्धा सन 2022-23 आयोजन दि. 07 ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राजवंदन लॉन / मंगल कार्यालय, भद्रावती जि. चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेकरिता नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, पूणे, नाशिक, मुंबई विभाग व 01 क्रीडा प्रबोधिनीतून 14 वर्ष आतील मुले व 17 वर्ष आतील मुले /मुलींचा संघ व संघ व्यवस्थापक (14 वर्ष आतील मुले 99 व 09 संघ व्यवस्थापक, 17 वर्ष आतील 117 मुले व 09 संघ व्यवस्थापक व 17 वर्ष आतील 126 मुली व 8 संघ व्यवस्थापक असे एकुण 368) व महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोशिएशन यांचेमार्फत मान्यता प्राप्त 35 तांत्रिक अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील सदर स्पर्धा पार पडणार आहे.
सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तहसिलदार अनिकेत सोनवाने, पोलीस निरीक्षक गोपाल भारती, महाराष्ट्र राज्य बॉक्सींग असो. सचिव डॉ. राकेश तिवारी, जिल्हा बॉक्सिंग असो. अध्यक्ष डॉ. प्रेमचंद, मिलींद वैद्य, सुदेश शेंडे, अजीत ओसवाल, उपस्थित होते.
सदर कार्याक्रमाप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर, यांनी वरोरा व भद्रावती करीता खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन व स्पर्धेसाठी विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.
कार्याक्रामाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले. यावेळी महिला बॉक्सींग खेळाडू प्रिती बोरकर, प्रज्ञा गायकवाड, पलक झामरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रामच्या शेवटी पलक झामरे, ज्यु. एशियन चॉम्पीयन, (जार्डन) सिल्वर मेडालीस्ट या खेळाडूने सर्व सहभागी खेळाडूंना शपथ दिली.
कार्याक्रमाचे संचालन व आभार महेश डोंगरे यांनी केले. यशस्वितेकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे राजु वडते, क्रीडा अधिकारी संदिप उईके, विजय डोबाळे, प्रविण देसाई, जिल्हा बॉक्सींग संघटनेचे सर्व पदाधिकारी व जिल्हा प्रशिक्षण केंद्र (बॉक्सींग), चंद्रपूर चे खेळाडू यांनी सहकार्य केले.
००००००
No comments:
Post a Comment