Search This Blog

Saturday 11 February 2023

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

 

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

Ø 2 हजार 803 लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चंद्रपूरदि. 11 : चंद्रपूर जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत 34 कोटी 98 लाख 14 हजार 400 रुपये निधी मंजूर झालेला आहे . जिल्ह्यातील मूलपोंभुर्णाबल्लारपूरचंद्रपूर या चार तालुक्यातील 2 हजार 803 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झालेले आहे.

शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी याबाबतचे मान्यता व निधी वितरणाबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. मूल तालुक्यातील बेंबाळकेळझरजुनासुर्लाफिस्कुटीगांगलवाडीखालावसपेठचकदूगाळाचितेगावविरईचिरोलीमरेगावआकापूरताडाळादाबगाव मक्तासुशी दाबगावराजगडनवेगाव भुजबाबराळाउथळपेठनलेश्वरमारोडापिपरी दीक्षितचिचाळामुरमाडीबोरचांदलीराजोलीनांदगावगोवर्धनटोलेवाहीचिमढाटेकाडीसिंतळा,येरगावउश्राळाभवराळाचांदापूरजानाळा,मोरवाहीचिखलीकोसंबी,काटवनडोंगरगावभादुर्णीहळदीभेजगावगाडीसुर्ला या गावातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पोंभुर्णा तालुक्यातून चेक आंबेधानोरादेवाडा खुर्दघाटकुळचक फुटाणाभीमणीबोर्डा बोरकरबोर्डा झुल्लरवारआष्टाचेक आष्टाउमरी पोतदारकसरगट्टाजामतुकूमदेवाडा बुजदिघोरीघनोटी तुकूमथेरगावजामखुर्द या गावांचा समावेश करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुक्यातून गिलबिलीआमडीदहेलीकवडजईकिन्हीमानोरालावारीहडस्तीईटोलीविसापूरकळमनापळसगावकोठारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

चंद्रपूर तालुक्यातून चकनिंबाळापायलीआरवटपडोलीमामलाचकवायगावपिपरीवरवटवढाशेनगावमारडाबोर्डायेरूरनागाळापडोलीजुनोनागोंडसावरीचिंच्चपल्लीबेलसनीमहाकुर्लागोंडसावरीचिचाळानकोडाजुनोनामारडा या गावांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून समावेश करण्यात आला आहे. लवकरच घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे.

०००००००

No comments:

Post a Comment