Search This Blog

Thursday, 23 February 2023

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने दलित वस्‍ती सुधार योजनेअंतर्गत 9 कोटींची विकासकामे मंजूर


पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने दलित वस्‍ती सुधार योजनेअंतर्गत 9 कोटींची विकासकामे मंजूर

Ø  बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलणार

चंद्रपूर, दि.23 : राज्‍याचे वनेसांस्‍कृतीक कार्यमत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या सातत्यपूर्ण पाठपुराव्‍यामुळे बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत (दलीत वस्‍ती सुधार योजना) सन 2022-23 या वर्षाकरिता ग्रामीण क्षेत्रातील दलित वस्‍त्‍यांमध्‍ये विकासकामांसाठी 9 कोटी रू. मंजूर करण्‍यात आले आहे.

राज्‍यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती व नवबौध्‍द घटकांच्‍या वस्‍त्‍यांमध्‍ये मुलभूत सुविधा पुरविण्‍यासाठी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन 2022-23 या वर्षासाठी (दलित वस्‍ती सुधार योजनेअंतर्गत) मंजूर बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात विकासकामे प्रामुख्‍याने मंजूर करण्‍यात आले आहेत.

यामध्‍ये सिमेंट काँक्रीट बंदीस्‍त नालीसिमेंट काँक्रीट रस्‍तेसमाजभवनचौकांचे सौंदर्यीकरणधम्‍मकेंद्रविपश्‍यना केंद्रप्रशिक्षण केंद्रविद्यार्थ्‍यांकरिता अभ्‍यासिका तथा स्‍मशानभुमी शेड इत्‍यादी विकासकामे मंजूर करण्‍यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने मंजूर सदर निधी ग्रामीण क्षेत्रातील अनुसुचित जाती लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात निश्‍चीत करण्‍यात आलेला आहे. या निधीच्‍या माध्‍यमातून बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्‍त्‍यांच्‍या विकासाचा मार्ग सुकर झाल्यामुळे बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment