भद्रावती येथे राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन
Ø 7 ते 11 फेब्रुवारी कालावधीत पार पडणार स्पर्धा
चंद्रपूर, दि. 06: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर तसेच चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय 14 वर्षीय मुले व 17 वर्षीय मुले-मुली बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 7 ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत करण्यात येत आहे. सदर स्पर्धा भद्रावती येथील राजवंदन लॉन व मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाकरीता प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुरेश धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. शेखर पाटील, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार व मुख्याधिकारी विशाल वाघ तसेच शिवछत्रपती पुरस्कारार्थी राजेश नायडू, कुंदन नायडू, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव डॉ. राकेश तिवारी, जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रेमचंद तसेच भद्रावती तालुका बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मिलिंद रायपुरे व ॲड. युवराज धानोरकर यांची उपस्थिती असणार आहे.
या स्पर्धेकरीता राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक व मुंबई विभाग व 1 क्रीडा प्रबोधिनीतून 14 वर्षाआतील मुले व 17 वर्षाआतील मुला-मुलींचा संघ व संघ व्यवस्थापक (14 वर्षातील 99 मुले व 9 संघ व्यवस्थापक, 17 वर्षातील 117 मुले व 9 संघ व्यवस्थापक तर 17 वर्षाआतील 126 मुली व 8 संघ व्यवस्थापक असे एकूण 368) उपस्थिती असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन यांच्यामार्फत मान्यताप्राप्त 35 तांत्रिक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली सदर स्पर्धा पार पडणार आहे.
स्पर्धेकरिता येणाऱ्या खेळाडूंची निवासव्यवस्था भद्रावती येथील श्री.श्वेतांबर जैन मंडल, भक्त निवासमध्ये तर भोजन व्यवस्था स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता राजवंदन लॉन व मंगल कार्यालय भद्रावती येथे पार पडणार आहे.असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment