पोवनी-गौरी ते राजुरा मार्ग जड वाहनांच्या वाहतुकीस बंद
Ø नागरीकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 28 : पोवनी-गौरी ते राजुरा या रस्त्याचे काम सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही व वाहतुकीचे नियमन व्हावे. तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याकरीता 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर कालावधीत पुलाचे बांधकाम अद्यापही पूर्ण न झाल्याने सदर मार्गावरील वाहतूक 31 मे 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंद करण्यात येत आहे. जनतेने पर्यायी मार्ग म्हणून राजुराकडून पडोलीकडे येणारी जड वाहतूक ही राजुरा-रामपूर-सास्ती-पोवनी-
पौवनी-गौरी-रामपूर-राजुरा या 7 किलोमीटर रस्त्याचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशीनरी ही मोठी असल्याने रस्ता बांधकाम करतांना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतूक सुरू ठेवल्यास लहान वाहनांना येण्या-जाण्याकरीता रस्ता अपुरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. अवजड वाहतूकदारांना राजुराकडून पडोलीकडे येण्यासाठी राजुरा-रामपूर-सास्ती-पौवनी-
00000
No comments:
Post a Comment