Search This Blog

Tuesday, 30 September 2025

Suo Motu Timely Action by Administration Prevents Bogus Voter Registration in Rajura Assembly Constituency.

 

Suo Motu Timely Action by Administration Prevents Bogus Voter Registration in Rajura Assembly Constituency.

 

Chandrapur, 30 September ,2025 The Electoral Registration Officer, Rajura, Chandrapur, has clarified that due to the prompt due diligence and action taken by the administration, attempts of bogus voter registration in the 70 – Rajura Assembly Constituency were successfully prevented.

During the period 1st to 17th October 2024, a total of 7,592 applications for new voter registration were received. On detailed verification conducted through Booth Level Officers, serious discrepancies were observed. Out of these, 6,861 applications were found invalid due to reasons such as applicants not residing at the given address, applicants being non-existent, or absence of proper photographs and supporting documents. Accordingly, these applications were rejected in due course, and no entry was made in the electoral roll.

Taking serious note of the matter, the District Election Officer instructed the Electoral Registration Officer and Sub-Divisional Officer, Rajura, to conduct a thorough inquiry into all applications and to initiate necessary criminal proceedings under the provisions of the Representation of the People Act, 1950 and the Information Technology Act, 2000.

Consequently, Crime No. 629/2024 has been registered at Rajura Police Station, and further investigation is being carried out by the Police Department.

The ERO office has reiterated that due to timely vigilance, 6,861 bogus applications were rejected and thus prevented from entering the electoral roll of the 70 – Rajura Assembly Constituency. Action was taken Suo Motu without any complaint.

 

– Office of the Electoral Registration Officer, Rajura AC, Chandrapur

शासनमान्य ग्रंथ यादीकरीता ग्रंथ पाठविण्याचे आवाहन


शासनमान्य ग्रंथ यादीकरीता ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

Ø अंतिम मुदत 15 ऑक्टो. 2025 पर्यंत

चंद्रपूर,  दि. 30 : राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनाराज्यात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची माहिती वा खरेदी करिता मार्गदर्शक ठरावी म्हणून ग्रंथालय संचालनालयाकडून वर्षनिहाय शासनमान्य ग्रंथांची यादी प्रकाशित करण्यात येते.

सन 2024 या कॅलेंडर (1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024) वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2024 या कॅलेंडर वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत (Complimentary copy) ग्रंथालय संचालकग्रंथालय संचालनालयनगर भवनटार्जन हॉलमुंबई-400001 यांच्याकडे 15 ऑक्टोबर, 2025 पर्यंत पाठविण्यात यावीत.

सन 2024 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाहीसदरचे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व ग्रंथालय संचालनालयाच्या www.doi.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याचे प्रग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी कळविले आहे.

००००००

भुमी अभिलेख कार्यालयातील नक्कल अर्ज विहित मुदतीतच निकाली

 भुमी अभिलेख कार्यालयातील नक्कल अर्ज विहित मुदतीतच निकाली

Ø गोंडपिपरी येथील भुमी अभिलेख उपअधिक्षकांचे स्पष्टीकरण

चंद्रपूरदि. 30 : भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोजणी व इतर शासकीय कामासंदर्भात फिल्डवर असतातमात्र असे असले तरी उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे नक्कल करीता आलेले अर्ज विहित मुदतीतच निकाली काढले जातातअसे स्पष्टीकरण गोंडपिपरी येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिक्षक अरुण व-हाडे यांनी दिले आहे.

गोंडपिपरी भुमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक (प्रतिलिपी लिपीकप्रशांत देशमुख यांची 15 सप्टेंबर  रोजी तहसीलदारगोंडपिपरी येथील लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाकरीता उपस्थित राहण्याकरिता नियुक्ती करण्यात आली होतीया दिवशी श्रीदेशमुख तहसिलदारगोंडपिपरी यांच्या कार्यालयात हजर होतेत्यामुळे नक्कल करीता आलेले सर्व अर्ज त्यांच्या कपाटात असल्याने सदर दिवशी नक्कल पुरविण्यात आल्या नाहीतमात्र दुस-या दिवशी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी कार्यालयात येऊन भुकरमापक देशमुख यांनी सर्व अर्ज नक्कल नोंदवहीत नोंदवून बाहेर काढून ठेवले.

उप अधीक्षकभूमि अभिलेखगोंडपिपरी कार्यालयात ते 22 सप्टेंबर या कालावधीत एकूण 112 नक्कलेचे अर्ज  प्राप्त झाले होतेत्यापैकी भूकरमापक श्रीदेशमुख यांनी 25 नक्कल अर्ज निकाली केले. 22 सप्टेंबर रोजी 22 नक्कल अर्ज निकाली, 23 सप्टेंबर रोजी कार्यालयातील इतर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून 53 नक्कल अर्ज निकाली काढण्यात आले आहेतदिवसाअखेर 12 नक्कल अर्ज शिल्लक आहेहे अर्ज विहीत मुदतीत निकाली काढण्याची दक्षता घेत असल्याचे गोंडपिपरी येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक अरुण व-हाडे यांनी कळविले आहे.

००००००

भेसळयुक्त विविध अन्नपदार्थाचा 17 लक्ष 26 हजार किमतीचा साठा जप्त


भेसळयुक्त विविध अन्नपदार्थाचा 17 लक्ष 26 हजार किमतीचा साठा जप्त

Ø अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

चंद्रपूरदि. 30 : अन्न व औषध प्रशासनचंद्रपूर कार्यालयाने सणासुदीच्या कालावधीत भेसळयुक्त अन्नपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तूपखाद्यतेलमिठाईभगरशेंगदानाबेसन व इतर असे एकूण 52 अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेला पाठविलेयात रिफाईड सोयाबीन तेलव्हाईट बर्फी, शेंगदानातुप व टोस्ट् इत्यादी अन्नपदार्थाचा 14627 किग्रॅवजनाचा किंमत 17 लाख 26 हजार 853 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

यात 6 लाख 382 रुपये किमतीचे रिफाईंड सोयाबीन, 1 लाख 75 हजार 560 रुपयांची व्हाईट बर्फी, 49 हजार 840 रुपये किंमतीचे खुले रिफाईंड सोयाबीन तेल, 6 हजार 240 रुपये किंमतीचे तूप, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे टोस्ट्, 6 लाख 74 हजार 600 रुपये किमतीचा शेंगदाना, 1 लाख 221 रुपये किंमतीचे बेसन इत्यादी अन्नपदार्थांचा साठा भेसळीच्या संशायावरून जप्त करण्यात आला आहेसदर अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणाकरीता प्रयोगशाळेस पाठविण्यात आले आहेतसदर अन्नपदार्थाचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमन 2011 नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल.

अन्न व्यावसासिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व नियमन 2011 च्या अंतर्गत नियमांचे  पालन करूनच अन्न व्यवसाय करावातसेच ग्राहकांनी सुध्दा कोणत्याही प्रकारच्या अन्न पदार्थांची तक्रार असल्यास त्यांनी सहायक आयुक्त यांचे कार्यालयअन्न व औषध प्रशासनश्री. राजमलजी पुगलीया नगरमुठाळ हॉस्पीटल जवळकोतपल्लीवार पेट्रोल पंपच्या मागेनागपूर रोडसिव्हील लाईनचंद्रपूर येथे संपर्क साधावा,  असे तथा सहायक आयुक्त (अन्नप्रउमप यांनी कळविले आहे.

००००००

शहीद बालाजी रायपूरकर आयटीआय मध्ये पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती

 शहीद बालाजी रायपूरकर आयटीआय मध्ये पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती

चंद्रपूरदि. 30 : शहीद बालाजी रायपूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिमूर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आलीया कार्यक्रमात एकात्म मानवतावाद, अंत्योदय विचारकतत्त्वज्ञ आणि प्रेरणास्त्रोत’ यावर प्रामुख्याने मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या प्राचार्य प्रणाली दहाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल मेहेर, गट निदेशिका पी.आर. बलकी, डॉश्यामजी हटवादे उपस्थित होते.

संस्थेच्या प्राचार्य प्रणाली दहाटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून त्यांना शॉर्ट कोर्स बद्दल मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मेहेर यांनी सुध्दा प्रशिक्षणार्थांना औद्योगिक शेत्रात होणारी क्रांती व त्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ याबाबत अवगत केलेसंस्थेच्या गटनिदेशिका बलकी यांनी संस्थेत सुरू होणा-या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती देवून औद्योगिक क्षेत्रात त्याचा होणारा उपयोग व स्वयंमरोजगारास उपयोगी येणारे कौशल्य समजावून सांगितले. तसेच शिल्प निदेशक सागर दरवळकर यांनी माहिती अधिकार यावर प्रशिक्षणार्थांना मार्गदर्शन केलेयावेळी माहिती अधिकार दिवससुध्दा साजरा करण्यात आलाडॉहटवादे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जीवनचरीत्रावर मोलाचे मार्गदर्शन केले .

 कार्यक्रमाचे संचालन संस्थेतील शिल्प निदेशक राहूल भेंडारकर  यांनी तर आभार शिल्प निदेशक अमोल पावडे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

Monday, 29 September 2025

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

चंद्रपूर,  दि. 29 : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

1) मतदार नोंदणी अधिनियम, 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 30 सप्टेंबर 2025, 2) कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी 15 ऑक्टोबर 2025 रोजी, 3) वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी 25 ऑक्टोबर 2025 रोजी, 4) प्रकरणपरत्वे नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा दिनांक 6 नोव्हेंबर 2025, 5) हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 20 नोव्हेंबर, 6) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 25 नोव्हेंबर रोजी, 7) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 12 अंतर्गत) 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 पर्यंत, 8) दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे 25 डिसेंबर रोजी आणि 9) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 30 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येईल.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासंबंधी नमुना – 18 मधील अर्ज स्वीकरण्याकरीता जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारीतहसीलदार व नायब तहसीलदारमुख्याधिकारी (बल्लारपूरघुग्घुसवरोरा), अतिरिक्त आयुक्तउपायुक्तसहायक आयुक्त (चंद्रपूर महानगर पालिका), सहायक संवर्ग विकास अधिकारी पं.चंद्रपूरसहायक निबंधक चंद्रपूरतालुका कृषी अधिकारी चंद्रपूर यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तरी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत दावे व हरकती 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत स्वीकरण्यात येणार आहेआपले नाव पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याकरीता पात्र असलेल्या पदवीधर मतदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारीनागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी केले आहे.

०००००००

बेलसणी येथील सद्यस्थितीतील पाणंद रस्ता स्थलांतरीत होणार

 बेलसणी येथील सद्यस्थितीतील पाणंद रस्ता स्थलांतरीत होणार

Ø प्रशासनाने मागविले 22 डिसेंबर पर्यंत हरकती व सुचना

चंद्रपूरदि. 29 : बेलसणीताचंद्रपूर येथील सद्यस्थितीत असलेला स.. 382, 389, 390, 391, 392  393 च्या पश्चिमेकडील बाजुने असलेला व स.. 379 ते 381 च्या पुर्वेकडील बाजुने असलेला व शेणगावकडे जाणारा पाणंद रस्ता आता स.. 381 च्या पूर्व-पश्चिम व त्यानंतर उत्तर दिशेने वळून स.. 379 ते 381 च्या पश्चिम दिशेने शेणगावकडे जाणा-या पाणंद रस्त्याकडे स्थलांतरीत होणार आहेयाबाबत प्रारुप अधिसुचना प्रसिध्द करून 22 डिसेंबर 2025 पर्यंत हरकती व सुचना मागविण्यात येत आहे.

मौजा बेलसणी येथील सर्व्हे नं.382, 383, 384, 385, 389/1, 389/2, 390, 391, 392, 393, 379 व 380 व मौजा मुरसा येथील सर्व्हे नं. 530 व 401 जागेवर उच्च क्षमतेचा स्टील प्रकल्प उभारणी करावयाची आहेपरंतु सदर जागेतून पाणंद रस्ता जात असल्याने स्टील प्रकल्प उभारणी करीता अडचण निर्माण होत आहेमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 21 (1)  (2) अन्वये राज्य शासनाची मालमत्ता किंवा त्याचा भाग असलेला कोणताही सार्वजनिक रस्तागल्ली किंवा मार्ग जनतेच्या वापराकरिता आवश्यक नाहीअशा सरकारी रस्त्यांमधील व रस्त्यावरील आणखी कोणताही हितसंबंध किंवा हक्क असणाऱ्या किंवा अशा प्रस्तावामुळे प्रतिकूल परिणाम होण्याचा संभव असणारा कोणताही हितसंबध किंवा हक्क असणाऱ्या लोकापैकी कोणत्याही इसम किंवा इसमास पोटकलम अन्वये अधिसूचना काढण्यात आल्याच्या तारखेनंतर 90 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडेअशा प्रस्तावाबाबतच्या आपल्या हरकतीअशा हितसंबधाचे किंवा हक्काचे स्वरूप आणि ज्या रीतीने त्याच्यावर प्रतिकूल परिणाम होण्याचा संभव असेल ती रीतआणि अशा हितसंबधाबद्दल किंवा हक्काबद्दल नुकसान भरपाईच्या मागणी रक्कम आणि तपशील लेखी सादर करता येईल.

मौजा बेलसणी येथील पाणंद रस्ता लागून असलेले पश्चिम बाजूकडील सर्व्हे क्र.380, 379 पूर्व कडील बाजूला सर्व्हे 382, 389 ते 393 पर्यंत जाणारा पाणंद रस्ता स्थलांतरीत करून सर्व्हे क्र. 379 ते 381 पूर्वेकडील बाजू आणि पश्चिमेकडील बाजूस सर्व्हे क्र. 378 च्या धुर्याने दक्षिण-उत्तरेकडे जाणारा तसेच उत्तर बाजूकडील सर्व्हे क्र. 381 दक्षिणेकडील बाजूस सर्व्हे क्र. 380 च्या धुर्याने पूर्वपश्चिम वळवून नकाशातील नमूद पाणंद रस्ताला स्थलांतरित करून आवेदकाच्या जमिनीमधून स.नं. 381, 380, 379 च्या पाणंद रस्ता दिल्यास मिलियन स्टील्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनागपूर यांना प्रकल्प उभारण्यास अडचण निर्माण होणार नाहीतसेच सध्यास्थिती मध्ये पांदन रस्त्याचा वापर करण्याऱ्या शेतकरी यांना वाहिती करता आवेदक यांच्या पूर्णतः जमिनीतून स्थलांतरीत होणारा पाणंद रस्ता उपलब्ध होणार असल्यामुळे उक्त समधील मूळ पाणंद रस्त्याची आवश्यकता नाही.

त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनमहाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम,1966 चे कलम 21 (1)  (2) जिल्हाधिकारी विनय गौडा जीसीयांनी, 23 सप्टेंबर 2025 रोजी प्रारुप अधिसुचना प्रसिध्द केली असून 22 डिसेंबर 2025 पर्यंत हरकती व सुचना मागविण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.  

००००००

Sunday, 28 September 2025

औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस







 औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण

Ø चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे

चंद्रपूर,  दि. 28 : चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे.  यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटलकौशल्यावर आधारित रोजगारआरोग्य ,पायाभूत सुविधांचा विकासशिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे.  विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहेअसे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुल (जि. चंद्रपूर) येथील विश्रामगृहातजिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईकेआमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवारकिशोर जोरगेवारदेवराव भोंगळे यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारेजिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी उत्खनन होतेतेथील नागरिकांना खनिज निधीचा फायदा झाला पाहिजे,  अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  खनिज उत्खनन आणि वाहतुकीमुळे जो त्रास स्थानिकांना होतो. त्यामुळे सर्वात जास्त वाटा स्थानिक लोकांनाच मिळाला पाहिजे.

चंद्रपूर जिल्ह्याने खनिज  क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. विशेष म्हणजे खनिज विकास निधीमधून रोजगार निर्मितीआरोग्यविकासशिक्षण,  कौशल्य आधारित  नाविन्यपूर्ण प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली हा परिसर इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून तयार होत आहे. त्यामुळे दीड लक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखून हा विकास आपल्याला करायचा आहे. औद्योगिकरणासोबतच चंद्रपूरने पर्यावरण संतुलन राखलेअसा संदेश गेला पाहिजे. कौशल्य विकास आणि रोजगारावर भर देऊन 100  टक्के स्थानिकांना रोजगार मिळेलअशी व्यवस्था आपण उभी करणार आहोत.

गतकाळात आपण 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वीरीत्या राबवली. यावेळी सुद्धा चंद्रपूरने वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट गाठावे. संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्र राज्याने ग्रीन कव्हर वाढवले असून आपला परिसर नैसर्गिक समृद्ध आहे. मात्र आता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचे वनक्षेत्र 33 टक्क्यांच्या वर नेण्याकरिता करिता विशेष लक्ष द्यायचे आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने खनिज विकास निधीतून अतिशय चांगले काम केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी तर आभार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मानले.

०००००००

Friday, 26 September 2025

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सुचनांची गांभीर्याने दखल घ्यावी








जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सुचनांची गांभीर्याने दखल घ्यावी

Ø पालकमंत्र्यांचे सर्व विभाग प्रमुखांना निर्देश

      चंद्रपूरदि. 25 : जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असतेयात जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांचा समावेश असतोआपापल्या मतदारसंघातील विकास कामांबाबत तसेच नागरिकांच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींकडून नियोजन समितीच्या बैठकीत मुद्दे उपस्थित केले जातातत्यांनी दिलेल्या सुचनांची सर्व विभाग प्रमुखांनी गांभीर्याने दखल घ्यावीअसे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी दिले.

            नियोजन भवन येथे जिल्हा नियेाजन समितीच्या बैठकीत ते बोलत होतेबैठकीला खासदार सर्वश्री प्रतिभा धानोरकरडॉनामदेव किरसानआमदार सर्वश्री सुधाकर अडबालेसुधीर मुनगंटीवारकिशोर जोरगेवारकिर्तीकुमार भांगडीयादेवराव भोंगळेकरण देवतळेजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहप्रभारी मुख्य वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्लानागपूर येथील उपायुक्त (नियोजनअनिल गोतमारेप्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे आदी उपस्थित होते.

            नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केलेल्या सुचनांची नोंद आणि अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधींना पोहचविला जाईलअसे सांगून पालकमंत्री डॉउईके म्हणालेसर्व विभागांनी आपापले प्रस्ताव सप्टेंबर अखेरपर्यंत सादर करावेजेणेकरून प्रशासकीय मान्यता वेळेत देणे सोयीचे होईलसेवा पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचा विषय प्राधान्याने घ्यावाशहरी व ग्रामीण अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावीसर्व शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणीशौच्छालय व इतर मुलभुत सोयीसुविधा असणे आवश्यक आहेतसेच जिल्ह्यातील शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छता गृहासाठी निधी उपलब्ध करून देऊसामान्य रुग्णालयात मृत्यु झाल्यास मृतदेह घरी नेण्याकरीता खनीज निधीमधून शववाहिकेसाठी निधी दिला जाईल.

शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पाणंद रस्त्याचा प्रश्न सेवा पंधरवड्यात मार्गी लावावाघरकुला पासून कुणीही वंचित राहणार नाहीयाची दक्षता घ्यावीचंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल / ॲनिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेआपला जिल्हा सिकलसेल मुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईलत्यासाठी कृती आराखडा सादर करावातसेच विद्युत कनेक्शनकरीता ज्यांनी अर्ज केले व पैसे भरलेत्यांच्याबाबत विशेष बाब म्हणून योग्य निर्णय घेण्यात येईलअसे पालकमंत्री डॉअशोक उईके यांनी सांगितले.

यावेळी सर्व खासदार व आमदारांनी सुचना केल्या.  तत्पुर्वी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गणित विषयाच्या विशेष पुस्तकाचे पालकमंत्री डॉउईके व इतर मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आलेप्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांनी सादरीकरण केलेयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारसहायक जिल्हा नियोजन अधिकारी मुजीब शेख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यासाठी एकूण मंजूर नियतव्यय : जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 साठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 700 कोटी 80 लक्ष रुपये नियतव्यय मंजूर आहेयात सर्वसाधारण योजनेकरीता 510 कोटीआदिवासी उपयोजनेकरीता 115 कोटी 80 लक्ष तर अनुसूचित जाती उपयोजनेकरीता 75 कोटी मंजूर नियतव्यय आहेयावेळीजून 2025 रोजी पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता प्रदान करणेजिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारणसंदर्भात कार्यपध्दती निश्चितीकरणनाविन्यपूर्ण योजनासप्टेंबर 2025 अखेरपर्यंत खर्चाचा आाढावा घेण्यात आला.

०००००००

प्रगत मूत्राशयाच्या कर्करोगासाठी प्रथमच ‘रेडिकल सिस्टो-प्रोस्टेक्टॉमी विथ इलियल कॉन्ड्युट’ शस्त्रक्रिया यशस्वी

 प्रगत मूत्राशयाच्या कर्करोगासाठी प्रथमच रेडिकल सिस्टो-प्रोस्टेक्टॉमी विथ इलियल कॉन्ड्युट शस्त्रक्रिया यशस्वी

Ø चंद्रपूरच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा

चंद्रपूर, 26 : चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक अभूतपूर्व यश मिळाले आहेकर्मवीर मा.सांकन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील शल्यचिकित्साशास्त्र विभागाने जिल्ह्यातील पहिलीच रेडिकल सिस्टो-प्रोस्टेक्टॉमी विथ इलियल कॉन्ड्युट ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेही शस्त्रक्रिया 72 वर्षीय शंकर अणकुलवार या रुग्णावर करण्यात आलीत्यांना प्रगत अवस्थेतील मूत्राशयाचा कर्करोग (Advanced Bladder Cancer) असल्याने ही शस्त्रक्रिया आवश्यक होती.

रेडिकल सिस्टेक्टॉमीमध्ये संपूर्ण मूत्राशयासह प्रोस्टेट व दोन्ही बाजूचे पेल्विक लिम्फ नोड्स काढले जातात आणि त्यानंतर रुग्णासाठी सुरक्षित लघवीसाठी इलियल कॉन्ड्युट (डायव्हर्जन युरोस्टॉमीतयार केला जातोही शस्त्रक्रिया अतिशय अवघड मानली जातेज्यासाठी उच्च तांत्रिक कौशल्यसुसंवादी टीमवर्क आणि विशेष शस्त्रक्रियेनंतरची काळजी आवश्यक असते.

या ऐतिहासिक शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉसरिता दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखालीडॉअमित चिद्दरवार (युरोसर्जनयांच्या नेतृत्वात बधिरीकरण विभागप्रमुख डॉराजेश नगमोथे व डॉतृप्ती बेलेकरतसेच निवासी डॉक्टर डॉशंतनू कल्पल्लिवारडॉकल्पक गरमाडेडॉफुरकान अहमदडॉअजित पावराडॉअजिंक्य गव्हाणेडॉशोएब शेख आणि परिचारिका वर्ग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीअणकुलवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्ण सध्या अतिदक्षता विभागात स्थिर आहे व त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉमिलिंद कांबळे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना सांगितले कीहा चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहेआतापर्यंत अशा उच्च दर्जाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना नागपूरहैदराबाद किंवा मुंबईसारख्या दूरवरच्या शहरांत जावे लागत होतेआता अशा सुविधा आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होत आहेतही मोठी क्रांती आहेहे यश केवळ शस्त्रक्रिया कौशल्य दाखवते असे नाहीतर कर्मवीर मा.सां.कन्नमवारशासकीय वैद्येकीय महाविद्यालय व रुग्णालयहे प्रगत वैद्यकीय सेवांचे केंद्र म्हणून झपाट्याने पुढे जात असल्याचेही अधोरेखित करतेया ऐतिहासिक शस्त्रक्रियेमुळे हजारो रुग्णांना स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाची उपचार सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

०००००

जिल्हाधिका-यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा

 

जिल्हाधिका-यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा

Ø लॉजिस्टिक पार्कला गती देण्याचे निर्देश

चंद्रपूरदि. 26 :  जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या अध्यक्षतेत जिल्हा उद्योग मित्र समितीजिल्हास्तरीय निर्यात प्रचलन परिषदस्थानिक लोकांना रोजगार आणि सामाजिक दायित्व निधीबाबत आढावा घेण्यात आलाबैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सुर्या यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगविषयक संघटनाचे पदाधिकारीअल्ट्राटेकधारीवाललॉयड मेटल इत्यादी अनेक कंपन्याचे प्रतिनिधीसंबंधित कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणालेचंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून जिल्ह्यात उद्योगांना सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहेजिल्ह्यातील निर्यातवाढी करीता मुल येथे प्रस्तावित असलेले लॉजिस्टीक पार्कला गती देण्यात यावीतसेच चंद्रपूर मध्ये जेपी असोसिएशन ही टेस्टींग लॅब व बँक ऑफ इंडीया चंद्रपूर येथे परकीय चलन कक्ष प्रस्तावित असून चंद्रपूर जिल्ह्यातील निर्यात वाढीकरीता खुप फायदेशिर ठरणार आहेएमआायडीसी क्षेत्रातील उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी संबधित विभागांना दिल्या.

 सर्व कंपन्यांनी दरवर्षी स्थानिकांना रोजगाराबाबतचा अहवाल महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे सादर करावे व उद्योगामध्ये जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य द्यावे.  सन 2024-25 मध्ये खर्च केलेल्या सीएसआर निधीबाबत तसेच सन 2025-26 च्या खर्च नियोजनाबाबत अहवाल महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांना सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

नवउद्यो्गासाठी एमआयडीसी मधील भुखंड उपलब्ध बाबतची माहिती chanda.nic या जिल्हा संकेतस्थाळावर अपलोड करावीतसेच प्रस्तावित असलेल्या रेडियल वेल बंधाऱ्याचे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे कार्यकारी अभियंता पाठबंधारे विभाग यांना निर्देश देण्यात आलेएमआयडीसी मधील व समोरील रस्ते दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश देण्यात आलेऔद्योगिक घटकांना नियमित विद्युत पुरवठा होण्याकरीता नविन फीडर बाबत महावितरणला सुचना देण्यात आल्या.

००००००

6 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिन

 ऑक्टोबर रोजी लोकशाही दिन

            चंद्रपूरदि.26 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतेतसेच दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतेतक्रारदारांनी सर्वप्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे व तालुकास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निकाली निघाल्यानंतर व समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावे.

ऑक्टोबर 2025 या महिन्याचा पहिला सोमवार ऑक्टोबर रोजी येत असल्याने या दिवशी दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच 15 दिवस आधी प्रतीत अर्ज सादर करावा. तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावीतद्नंतरच तक्रार अर्ज स्विकारण्यात येईलअसे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Thursday, 25 September 2025

जून-जुलै महिन्यातील अतिवृष्टी नुकसानीचे 7 कोटी 32 लक्ष रुपये अनुदान वाटप सुरू

 

जून-जुलै महिन्यातील अतिवृष्टी नुकसानीचे 7 कोटी 32 लक्ष रुपये अनुदान वाटप सुरू 

Ø ऑगस्ट महिन्याचा 12 कोटी 53 लाखांचा निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर

चंद्रपूरदि. 25 : चंद्रपूर जिल्ह्यात जून - जुलै 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे 289 गावातील 8621.06 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यात बाधित झालेल्या शेतकरी संख्या 13742 आहे. या शेतक-यांसाठी शासनाकडून  7 कोटी 32 लक्ष 99 हजार 414 रुपये अनुदान प्राप्त झाले. हे अनुदान वाटप संगणकीय प्रणाली प्रक्रियेद्वारे सुरू आहे. तर

ऑगस्ट 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14,275.24 हेक्टर जमीन बाधित झाली. यात 16093 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यासाठी लागणारे 12 कोटी 53 लाख 37 हजार 680 रुपयांचा निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. अनुदान प्राप्त होताच तात्काळ मदत वाटप करण्यात येईल,  असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

000000000