Search This Blog

Wednesday, 17 August 2022

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 


महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत -         सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई / चंद्रपूरदि. 17 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने 15 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर2022 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

61 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 15 नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्रातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच हौशी हिंदीसंगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी जानेवारी 2023 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 जानेवारी 2023 पासून 10 केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2023 मध्ये आयाजित करण्यात येणार आहे.

नाट्य स्पर्धेकरीता 3 हजार इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष तर बालनाट्य स्पर्धेकरीता 1 हजार इतक्या रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालकसांस्कृतिक कार्यमहाराष्ट्र राज्यमुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिकानियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 15सप्टेंबर2022 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.

1) मुंबईकोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयजुने सचिवालयविस्तार भवनपहिला मजलामहात्मा गांधी मार्गमुंबई-३२ (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

2) पुणे महसूल विभागातील संस्थांनीसहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयबंगला क्रमांक-4, विमानतळ रोडपुणे (7579085918) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

 3) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयरुम नंबर-०२एमटीडीसी बिल्डिंगगोल्डी टॉकीजच्या समोरस्टेशन रोडऔरंगाबाद-431005 (08788893590) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

4) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालकसांस्कृतिक कार्य संचालनालयविभागीय कार्यालयद्वारा : अभिरक्षकमध्यवर्ती संग्रहालयअस्थायी प्रदर्शन हॉलतळमजलासिव्हिल लाईननागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.

विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाहीयाची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाहीतर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्य स्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.

राज्यातील जास्तीत जास्त नाटय संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment