बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागातील
विकास कामांसाठी 55 कोटी 50 लक्ष मंजूर
Ø वन व सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित
चंद्रपूर दि. 23 ऑगस्ट : राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी 55 कोटी 50 लक्ष रुपयांच्या विकास कामांना मंजूरी मिळाली आहे.
ग्रामीण भागातील जनतेची, रस्ते व पुलासंदर्भातील मागणी लक्षात घेता श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. जुलै 2022 च्या पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर विकासकामांमध्ये प्रामुख्याने बल्लारपूर तालुक्यातील मानोरा-कवडजई-कोठारी रस्त्याची सुधारणा 6 कोटी रुपये, माना-नांदगांव-विसापूर रस्त्याची सुधारणा 3 कोटी 50 लक्ष, चंद्रपूर तालुक्यातील मरारसावरी-नागाळा रस्त्यावर अंधारी नदीवरील मोठया पुलाच्या पोचमार्गाकरीता भुसंपादन करणे 50 लक्ष, चंद्रपूर तालुक्यातील तालुका सीमा ते मुल तालुक्यातील टेकाडी-चिमढा-आकापूर-दत्तमंदी
मुल तालुक्यातील उमरी तुकूम-आंबेधानोरा-डोंगरहळदी-सु
ग्रामीण भागातील रस्ते व पुलाच्या बांधकामाची कामे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मार्गी लागल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment