Search This Blog

Thursday 11 August 2022

जवाहर नवोदय विद्यालयात आरोग्य शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम

 जवाहर नवोदय विद्यालयात आरोग्य शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 11 ऑगस्ट : अॅलूमिनी असोशिएशन बहुद्देशीय संस्था व माजी विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली यांच्या सहयोगाने जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बा.), येथे आरोग्य शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला ब्रह्मपुरीचे उपविभागिय अधिकारी संदीप भस्के, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे तसेच जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी शिक्षक रवींद्र रमतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

या दोन दिवसीय कार्यक्रमात जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तर आरोग्य शिबिरातंर्गत आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनी तसेच गावकऱ्यांनी घेतला. तदनंतर, शालेय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

००००००

No comments:

Post a Comment