तेंदूपत्ता रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणारी रक्कम यापुढे पूर्णपणे मजूरांना बोनसच्या स्वरूपात देणार
Ø वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांची विधान परिषदेत घोषणा
चंद्रपूर,
दि. 25 ऑगस्ट : तेंदूपत्त्यापासून वनविभागाला रॉयल्टीच्या स्वरूपात मिळणा-या
राशीमधून प्रशासकीय खर्च वजा करता उर्वरित रक्कम प्रोत्साहनार्थ मजूरी अर्थात
बोनस म्हणून तेंदूपत्ता मजूरांना दिली जाते. मात्र 2022 पासून रॉयल्टीच्या स्वरूपात
मिळणारी रक्कम ही पूर्णपणे बोनसच्या स्वरूपात मजूरांना देण्याचा निर्णय
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत जाहीर केला.
दिनांक
24 ऑगस्ट 2022 रोजी विधान परिषदेत डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या
लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 2020
मध्ये रॉयल्टीच्या स्वरूपात मिळालेली रक्कम ही प्रशासकीय खर्चापेक्षा कमी
असल्यामुळे बोनस दिला गेला नाही. 2021 मध्ये 19.87 कोटी रक्कम
बोनसच्या स्वरूपात
मजूरांना देण्यात आली. 2022 मध्ये रॉयल्टीच्या स्वरूपात 72 कोटी इतकी रक्कम
जमा झाली आहे. मात्र यापुढे या रकमेतून प्रशासकीय खर्च न करता ही पूर्ण रक्कम
मजूरांना बोनसच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे
आता जवळपास चौपट रक्कम बोनसच्या स्वरूपात मजूरांना मिळणार आहे.
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वनक्षेत्रात राहणा-या तसेच पर्यावरणाचे संवर्धन व
संरक्षण करणा-या तेंदूपत्ता मजूरांना आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण करण्याच्या
दृष्टीने हा निर्णय घेण्यात येत असल्याचे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी
सांगितले. 2021 चा तेंदूपत्ता बोनस येत्या दोन महिन्यात मजूरांना मिळेल अशी व्यवस्था
करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
००००००
No comments:
Post a Comment