बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती
चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने बल्लारपूर पोलिस स्टेशन अंतर्गत तहसील कार्यालय, पोलिस विभाग व श्री संत गाडगेबाबा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोपेड तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले.
बल्लारपुर येथील गोंड राजे समाधी स्थळ, शिवाजी वार्ड येथे तहसीलदार कांचन जगताप, वनविकास मंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रैलीला रवाना करण्यात आले. यावेळी सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी, सखीमंच, हिरकणी ग्रुपच्या महिला, गुरुनानक कालेज, एम जे एफ कॉलेजचे विद्यार्थी व गावातली प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
सदर रॅली ही जूना बस स्टॉप, नगर परिषद चौक, नवीन बस स्टॉप, बालाजी वार्ड, गणपती वार्ड, जोकु नाला या मार्गावरुन गेल्यानंतर बल्लारपूर किल्ला येथे रॅलीची सांगता करण्यात आली. रॅली मार्गावरील सर्व संत, महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅलीमध्ये भारतमाताची वेश परिधान केलेल्या महिला आकर्षण ठरल्या . रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी झेंडा लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या रैलीमध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार , महिला अंमलदार, सखी मंच, रणरागिणी हिरकणी ग्रुप, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक हातात तिरंगा घेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००
No comments:
Post a Comment