Search This Blog

Wednesday, 10 August 2022

17 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 

17 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 10 ऑगस्ट : जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तर तालुकास्तरावर चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.  माहे ऑगस्ट महिन्याचा तिसरा सोमवार स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी येत आहे. व दुस-या दिवशी 16 ऑगस्ट रोजी नवीन पारसी वर्ष निमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर असल्याने या महिन्याचा महिला लोकशाही दिन बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या दालनात घेण्यात येईल.

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तहसील कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारला आयोजित करण्यात येतो. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाबी, अशी प्रकरणे आणि विहीत अर्जात नसलेली प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी, ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार, निवेदन  वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहित नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा  महिला  व बालविकास अधिकारी कार्यालयात स्वीकारण्यात येईल.

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनासाठी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सदर तक्रार अर्ज संबंधित विभागाला कार्यवाही करण्यासाठी पाठविण्यात येते. आणि तक्रार अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाला बोलविण्यात येते. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment