Search This Blog

Tuesday 23 August 2022

पाईप टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या मातीची तात्पुरती साठवणूक

 पाईप टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या मातीची तात्पुरती साठवणूक

चंद्रपूर, दि. 23 ऑगस्ट : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत घोडाझरी शाखा कालव्यावरील उपशाखा कालवा क्र.-1 वरून निर्गमित नाचनभट्टी बंदनलिका वितरण प्रणालीचे काम प्रगतीपथावर असतांना बंद नलिकेच्या काही ठिकाणी नाला ओलांडणी येत असून या ठिकाणी पाईप टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. तसेच माती बाजूला तात्पुरती साठविण्यात आली होती. सखल भाग असल्याने पाईप खोदाईमध्येसुद्धा पाणी येत असल्यामुळे डीवॉटरिंग करून पाईप टाकण्यास काही कालावधी लागला.

त्यामुळे सदर मातीची साठवणूक असलेल्या रत्नापूर येथील शेतकरी नामदेव काशिनाथ बोरकर व हरिदास बोरकर यांच्याशी मंडळ कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या उपविभागीय अधिकारी घोडाझरी कालवे उपविभाग क्र.-4 सिंदेवाही यांनी त्वरित संपर्क साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या जमिनीवर तात्पुरत्या स्वरूपात साठवलेली माती कंत्राटदारांकडून काढून पाईप ट्रेंचमध्ये भरण्यात आली. तसेच बाजूने वाहणाऱ्या नाल्याचा प्रवाह सुरळीत करून देण्यात आला. याव्यतिरिक्त सदर शेतकऱ्यांची जमीन समतल करून व धुरे बांधून देण्यात आले. त्यामुळे सदर शेतकऱ्यांची कोणतीही अडचण राहिली नाही, असे नागपूर, गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता उ.म.पवार यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment