चिचपल्ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी 14 कोटींचा निधी मंजूर
Ø जुलै
2022 च्या पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद
Ø वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलीत
चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्हयातील चिचपल्ली येथील बांबु
संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी जुलै 2022 च्या पुरवणी अर्थसंकल्पात 14 कोटी 1 लक्ष 47 हजार रू. निधीची
तरतूद करण्यात आली आहे. वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला
यश प्राप्त झाले आहे.
2014 मध्ये वनमंत्री
पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांपैकी चिचपल्ली येथील बांबु संशोधन व
प्रशिक्षण केंद्राची निर्मिती हा एक निर्णय होता. चंद्रपूर जिल्हयामध्ये
काही समाज पारंपरिकरित्या बांबुपासून वेगवेगळया रोजच्या वापराच्या
वस्तु बनविण्याचा व्यवसाय करतात. चंद्रपूर व परिसरात बांबूचे मोठया प्रमाणात
उत्पादन होते. मात्र काही समुदायापुरता मर्यादित झालेला उद्योग
विस्तारीत करणे आणि यामध्ये नव्या तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे होते.
याच
उद्देशाने वनमंत्री
म्हणून श्री.
मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या अंतर्गत येणा-या महाराष्ट्र बांबू विकास मंडळामार्फत
चंद्रपूरमध्ये चिचपल्ली परिसरात बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची सुरूवात
केली. या संशोधन केंद्रामध्ये दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून
महाराष्ट्राच्या विविध भागांतील मुलांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.
या ठिकाणी तयार करण्यात आलेला तिरंगाध्वज व अन्य भेट वस्तु मोठया प्रमाणात महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय
झाल्या असून पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सुध्दा येथे तयार झालेल्या तिरंग्याचे कौतुक केले आहे.
चंद्रपूर जिल्हयात कायमस्वरूपी एक मोठे प्रशिक्षण व संशोधन केंद्र निर्माण झाले
आहे. हा परिसर भारताच्या ईशान्य पूर्वेकडील राज्याला जोडला जात असून रोजगार व कौशल्य
निर्मितीसाठी हे केंद्र नावलौकीकास आले आहे.
चिचपल्ली
येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरीता मंजूर 14 कोटी 1 लक्ष 47 हजार रू.
निधीअंतर्गत या प्रकल्पातील बांबु कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे, आग प्रतिबंधक
योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्वयंपाकगृह
इमारतीचे बांधकाम करणे व विद्युत विषयक कामे करण्यात येणार आहे. सदर निधी मंजूर झाल्याने
या प्रकल्पाशी संबंधित कामांना गती प्राप्त होणार आहे.
००००००
No comments:
Post a Comment