अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे नवनिर्मित कार्यालय सुरू
Ø नमूद पत्यावर पत्रव्यवहार करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय दि. 29 जून 2022 अन्वये, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय, चंद्रपूर येथे स्थापन करण्यात आले असून दि. 7 जुलै 2022 पासून नवनिर्मित समिती कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने सदर कार्यालयाचा पत्ता हा सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालय चंद्रपूर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय भवन, दुसरा माळा, पिनकोड 442401 व ई-मेल आयडी cvcchandrapur@gmail.com असा आहे. तरी, संबंधितांनी पत्रव्यवहार करताना नमूद पत्यावर करावा, असे चंद्रपूर, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष जितेंद्र एन.चौधरी यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment