महाऊर्जाच्या वतीने उज्वल भारत, उज्वल भविष्य कार्यक्रम
Ø स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी आयोजन
चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाऊर्जा जिल्हा कार्यालयामार्फत उज्वल भारत उज्वल भविष्य या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. चंद्रपुर येथील शाळांमध्ये व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये महाऊर्जाच्या वतीने अपारंपारिक ऊर्जा योजनेअंतर्गत ऊर्जा संवर्धन व ऊर्जा बचत, प्रधानमंत्री कुसुम-ब योजना, पाणीपुरवठा योजना, सौर उष्णजल संयंत्रे, स्वयंपाकासाठी आवश्यक उपकरणे, सौर ऊर्जेवर राबविणे, ग्रामीण विद्युतीकरण आदींची माहिती यावेळी देण्यात आली.
डॉ. अनिल ओंकार यांनी ऊर्जा संवर्धन व ऊर्जा बचत या विषयावर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, चंद्रपूर व साई अभियांत्रिकी कॉलेज, भद्रावती येथे उर्जेची बचत कशाप्रकाचे करण्यात येईल व जीवनात याची गरज किती महत्वाची आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्प अधिकारी रोशन मानकर, सुशिल शिलाम, आकाश निरकुलवार व विनय सरोदे यांनी महाऊर्जाच्या विविध योजना बद्दल माहिती सांगितली व या योजनांचा शासकीय कार्यालय, वैयक्तिक, शेतकरी यांना लाभ देण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शासकीय अभियांत्रिकी कॉलेज येथील डॉ. अनंत देशपांडे, विद्युत विभाग प्रमुख डॉ. राजूरकर, यंत्र विकास प्रमुख तसेच साई अभियांत्रिकी कॉलेज भद्रावती येथील प्राचार्य डॉ. गोरंटीवार उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रादेशिक संचालक वैभवकुमार पाथोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. व महाऊर्जातर्फे राबविण्यात येण्याच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
००००००
No comments:
Post a Comment