Search This Blog

Friday 5 August 2022

अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

 अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट :  सिंदेवाही, पोलिस स्टेशन अतंर्गत दसरा चौक, सिंदेवाही येथे 30 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत असल्याची माहिती सिंदेवाही, पोलिस स्टेशनला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळावर जाऊन मृतकाच्या नातेवाईकाचा शोध घेतला असता अजूनपर्यंत मिळून आले नाही. तसेच सदर मृतकाची ओळख देखील पटली नाही.  त्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी अधिक तपास पोलिस स्टेशन, सिंदेवाहीमार्फत करण्यात येत आहे.

सदर मृतक हा अनोळखी असून त्याचे वय अंदाजे 45 वर्षे आहे तर उंची अंदाजे 165 से.मी. आहे. सदर वर्णनाच्या मृतक व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशन, सिंदेवाही येथील पोलीस उपनिरीक्षक बळीराम गेडाम 9975035751 व सहा.पोलीस निरीक्षक योगेश घारे 7588397725 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे सिंदेवाही, पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बळीराम गेडाम यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment