Search This Blog

Wednesday, 17 August 2022

बल्लारपूर येथील रक्तदान शिबिरामध्ये 75 लोकांनी केले रक्तदान

 




बल्लारपूर येथील रक्तदान शिबिरामध्ये 75 लोकांनी केले रक्तदान 

चंद्रपूर, दि. 17 ऑगस्ट :  स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सववानिमित्त बल्लारपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी पाटील, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, संवर्ग विकास अधिकारी किरण कुमार धनवडेपोलिस निरीक्षक उमेश पाटील आदी उपस्थित होते.  

सर्वप्रथम कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यां ची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर रक्तदान शिबिरामध्ये डॉ. दीप्ती सूर्यवंशी, नायब तहसीलदार सतीश साळवेनिरीक्षण अधिकारी भरत तुबडेकोषागार अधिकारी पंकज खनके, शैलेश धात्रक, सुनील चांदेवारॲड. गणेश जगतापदीपक वडुळेअजय गाडगेचंदू आगलावेगजानन उपरेप्रमोद अडबालेअजय नवकरकर, शंकर खरूले इत्यादी अधिकारी व कर्मचा-यांसह एकूण 75 जणांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाचे संचालन दिपक वडुळे यांनी आभार प्रियंका खाडे यांनी मानले. यावेळी उपविभागीय अभियंता श्री. मुत्तलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.  मेश्रामराजू धांडे, कर्मचारी महसूल संघटनेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय राजुरा येथील कर्मचारीआशा वर्करमतदान केंद्रस्तरीय अधिकारीरास्त भाव दुकानदार संघटनाअमन पसंद बहुउद्देशीय संस्थासेव फॉरेस्ट सेव चंद्रपूर संस्थारोटारॅक्ट क्लबतसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

००००००

No comments:

Post a Comment