Search This Blog

Wednesday, 10 August 2022

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास रुग्णोपयोगी साहित्य व वैद्यकीय उपकरणे प्राप्त

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास रुग्णोपयोगी साहित्य व वैद्यकीय उपकरणे प्राप्त

चंद्रपूर, दि. 10 ऑगस्ट : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूरला सी.एम.पी.डी.आय (सेंट्रल माईंड प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेड),नागपूर यांच्या सीएसआर निधीतून 12 लाख रुपयाचे साहित्य व उपकरणे नुकतेच प्राप्त झाले.

यावेळी सी.एम.पी.डी.आय, नागपूर संस्थांन-4 च्या सीएसआर विभाग प्रमुख जसप्रीत कौर, सीएसआर नोडल अधिकारी प्रियंका तिवारी, सी.डी. जसबीर सिंग, अंजनी युल्लू, राहुल सिंग हरिपल, वंदना थोटे, निखिल जोगी, महादेव कांबळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने, अधिसेविका विद्या पळसकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना सी.एम.पी.डी.आयच्या सी.एस.आर विभाग प्रमुख जसप्रीत कौर यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यात रुग्णालयाला रुग्णसेवेकरीता आणखी साहित्य व वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आश्वासन दिले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने यांनी रुग्णहित समोर ठेवून सी.एस.आरच्या माध्यमातून रुग्णालयाला वस्तू व वैद्यकीय उपकरणे देणगी रूपात दिल्याबद्दल सी.एम.पी.डी.आयच्या संपूर्ण चमुचे आभार मानले. सदर साहित्य, वस्तू आरोग्य सेवा देतांना अतिशय महत्त्वाच्या असून भविष्यात अशाप्रकारची मदत करण्याचे आवाहन केले.

 देणगी स्वरूपातील वस्तू व वैद्यकीय उपकरणे प्राप्त करण्याची संपूर्ण प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जीवने यांचे मार्गदर्शनात समाजसेवा विभागाचे समन्वय अधिकारी भास्कर झळके यांनी सी.एम.पी.डी.आय नागपूरचे महादेव कांबळे यांच्याशी समन्वय साधून देणगी साहित्य, वस्तू प्राप्त करून देण्यात आल्या. समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे, संजय गावित, हेमंत भोयर यांचे देणगी वस्तू प्राप्त करून देण्यात मोलाचे सहकार्य लाभले. 

या साहित्यामंध्ये पीपीई किट, बेड, पल्स ऑक्सीमीटर, ऑक्सीजन कॉन्सट्रेटर, डिजीटल थर्मामीटर, थर्मल गन, मास्क आदी साहित्यांचा समावेश आहे. शहरातील दानशूर संस्था व व्यक्तींनी रुग्णहित समोर ठेवून सामाजिक उत्तरदायित्वासाठी पुढे यावे,असे आवाहन याप्रसंगी उपस्थित मान्यवरांकडून तसेच समाजसेवा विभागाकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत भोयर यांनी केले. संचालन राकेश शेंडे तर आभार संजय गावित यांनी मानले.

००००००

No comments:

Post a Comment