Search This Blog

Thursday, 25 August 2022

जिल्ह्यात स्टार्टअप व नाविण्यता यात्रेचे आगमन

 

जिल्ह्यात स्टार्टअप व नाविण्यता यात्रेचे आगमन

Ø 26 ऑगस्ट रोजी चिमूर तालुक्यातून यात्रेचा शुभारंभ

Ø  उद्योग सुरु करण्यास इच्छुक उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट :  राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविण्यता विभागातर्फे, दि.26 ऑगस्ट 2022 पासून, जिल्हामध्ये स्टार्टअप व नाविण्यता यात्रा मार्गक्रमण करणार आहे. 26 ऑगस्ट रोजी सदर यात्रेचा शुभारंभ चिमुर तालुक्यातून होत असून दि. 03 सप्टेंबर 2022 रोजी राजुरा तालुक्यामध्ये समाप्त होत आहे. यात्रेचा कॅम्प  दि. 5 व 6 सप्टेंबर 2022 रोजी चंद्रपूर येथे आयोजीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नवसंकल्पना घेवून उद्योग सुरू करण्यास इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करून सादरीकरण करावे.

स्टार्टअप व नाविण्यता यात्रेअंतर्गत असलेले वाहन, तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोकसमुहाच्या स्थळी, योजनेचा प्रसार  व प्रचार करणार आहे. सदर यात्रा दि. 26 ऑगस्ट रोजी  चिमुर व नागभीड, 27 ऑगस्ट रोजी  ब्रम्हपूरी व सिंदेवाही, 29 ऑगस्ट रोजी  मुल व सावली,  30 ऑगस्ट रोजी  जिवती व कोरपना 1 सप्टेंबर रोजी चंद्रपूर, 2 सप्टेंबर रोजी भद्रावती, वरोरा, गोंडपिंपरी, पोंभुर्णा  तर 3 सप्टेंबर रोजी बल्लारपुर व राजुरा तालुक्यातून मार्गक्रमण करणार आहेत. सदर यात्रेनंतर दि. 5 व 6 सप्टेंबर रोजी चंद्रपुर येथील बुट कॅम्पमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी, स्टार्टअप  व नाविण्यता उद्योगाबाबत सादरीकरण करावे.

उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या सादरीकरणात अनुक्रमे  रु.25 हजार, 15 हजार व 10 हजार रु.पारितोषिक देण्यात येणार असून या माध्यमातून सदर सादरीकरण विभागीय तसेच राज्यस्तरावर सादर करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.  सदर यात्रेमध्ये सहभागी होण्याकरीता http://bit.ly/EntrepreneurSpeaker  या लिंकचा  वापर करावा. यात्रेमध्ये जिल्हातील नवकल्पक उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment