‘आयुष्याला संतुलित कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन
चंद्रपूर, दि. 18 ऑगस्ट : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयामार्फत ‘आयुष्याला संतुलित कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. सदर मार्गदर्शन सत्र दि. 23 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1 ते 2 वाजताच्या कालावधीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र. 5 व 6, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.
सदर विषयावर विजन इन्स्टिट्यूटचे संचालक पॉल अॅनड्युटी सर मार्गदर्शन करणार आहेत. बेरोजगार उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे गरजेचे आहे. तरी, जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment