Search This Blog

Monday, 22 August 2022

महाकृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना

 महाकृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना

Ø जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 22 ऑगस्ट : महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) तर्फे राज्यातील कृषी पंप वीज जोडणीचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरणाची प्रधानमंत्री कुसुम-ब योजना 90-95 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यात पारेषण विरहित सौर कृषीपंपाची आस्थापना करण्यात येणार असून शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 एचपी, 5 एचपी व 7.5 एचपी क्षमतेचे पारेषण विरहित सौर पंप आस्थापित करता येतील. सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरून सौर पंप उपलब्ध होऊ शकेल. शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारे नदी, नाले, शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे, पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे, अटल सौर कृषी पंप योजना टप्पा-1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले परंतू मंजूर न झालेले शेतकरी, अर्जदार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.

या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana/component-B या संकेतस्थळावर भेट  द्यावी किंवा महाऊर्जा जिल्हा कार्यालयाच्या 07172-256008 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा, प्रेस्टीज प्लाझा, विवेकनगर, मुल रोड, चंद्रपूर येथे संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाऊर्जा कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment