Search This Blog

Wednesday, 20 May 2026

हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियानचा लाभ घेण्याचे आवाहन

 

हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियानचा लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 20 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी प्रकल्पांतर्गत गावात  हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियानप्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हवामानातील अनिश्चितता व एलनिनोचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे उत्पादन शाश्वत करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सदर अभियान राबवण्यासाठी ग्राम कृषी विकास समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या अभियानात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना लागू असलेले सर्व तंत्रज्ञानाचा 100 टक्के शेतावर अवलंब करून कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्यासाठी सक्षम व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान अंतर्गत 18 ते 23 मे, आणि 25 ते 30  मे 2026 या कालावधीमध्ये टप्याटप्प्याने प्रत्येक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी प्रकल्पांतर्गत सर्व शेतक-यांनी सदरील प्रात्याक्षिक मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. या अभियानांतर्गत 1) रुद व रंबे (बेड) तयार करणे, टोकन पद्धतीने लागवड करणे, शून्य मशागत पद्धत, आंतरपीक घेणे, 2) बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया करणे, सापळा पिकांची लागवड करणे, 3) लिंबोळ्या गोळा करणे निंबोळी व दशपर्णी अर्क तयार करणे निमात्र अग्न्याख ब्रह्मात्र तयार करणे, 4) जीवामृत बिजामृत घन जीवामृत तयार करणे, 5) पक्षी तांबे व चिकटसापळी लावणे, ट्रायकोगार्डचा वापर करणे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे आदींबाबत माहिती देण्यात येत आहे.

यापूर्वीसुध्दा 20 ते 30 एप्रिल, 4 ते 3 मे, आणि 11 ते 16 मे 2026 या कालावधीत प्रकल्पांतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान राबविण्यात आले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात हवामान अनुकूल अभियानात प्रत्यक्ष सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment