पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि.15 : पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास अभियान अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या नोंदणी साठी pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावी. या योजनेअंतर्गत देशातील अग्रगण्य कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी कोणतेही पदवी उमेदवाराकरीता इंन्डसलँड बँकेमध्ये एक जागा उपलब्ध असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 30 मे 2026 आहे.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उददेश आहे. प्रत्येक इंटर्नसाठी प्रति महिना 9 हजार रूपये देण्यात येणार आहे व इंटर्नशिपचा कालावधी 6 किंवा 9 महिने आहे. भारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत या प्रशिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष असून पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेले रोजगार इच्छुक तरुणांसाठी ही संधी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment