अनुदानावर बियाणांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करा
चंद्रपूर, दि. 27 : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शिर्षक अंतर्गत 'बियाणे' घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2026-27 अंतर्गत 100 टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे, या बाबीचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी शेतकरी योजना’ या पोर्टलवर सोयाबीन बियाणेसाठी अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
००००००

No comments:
Post a Comment