‘चीज ॲनालॉगचा’ वापर होत असल्यास स्पष्ट उल्लेख करा
Ø अन्न व औषध प्रशासनाचे रेस्टॉरंट, हॉटेल्स, कॅटरर्स आदींना निर्देश
चंद्रपूर, दि. 29 : राज्यातील काही रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्
पनीर हा पदार्थ दुधापासून बनविला जाणारा डेअरी पदार्थ आहे. तर चीज ॲनालॉग हे दुधाव्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, फुड ॲडिटीव्ह इ. चा वापर करून तयार केले जाते. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 नियम व नियमने, 2011 अन्वये चीज ॲनालॉगच्या उत्पादनाला/विक्रीला/वापरला बंदी नाही, परंतु उपभोक्त्यांना ते जे अन्न ग्रहण करतात, त्याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी अन्नपदार्थातील घटकांची माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके नियम, 2020 नुसार अन्न व्यवसायिकांनी अन्न विक्री करताना संबंधित पोषण माहिती व घटकांची माहिती स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.
त्यानुषंगाने राज्यातील पनीर व चीज ॲनालॉग उत्पादकांना त्यांच्या बिलामध्ये तसा स्वयंस्पष्ट उल्लेख करण्याबाबत तसेच राज्यातील सर्व रेस्टॉरंट/हॉटेल्स/केटरर्स/फास्
सदर बाबीची जनजागृतीद्वारे प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असून ग्राहकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आपापल्या स्तरावर पनीर व चीज ॲनालॉग बाबतची माहिती आपल्या अधिनस्त उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व जिल्ह्यातील इतर प्रशासकीय यंत्रणेस द्यावी, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे – पाटील यांनी कळविले आहे.
०००००००

No comments:
Post a Comment