मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत 25 मे रोजीची यात्रा स्थगित
चंद्रपूर, दि. 22 : राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी 25 मे ते 30 मे या कालावधीत महाबोधी मंदीर बुध्दगया (बिहार) येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव लाभार्थ्यांना घेऊन जाणारी 25 मे रोजीची यात्रा स्थगित करण्यात आली असून यात्रेची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
०००००००

No comments:
Post a Comment