शासकीय वाहनांचे निर्लेखनकरीता अर्ज आमंत्रित
चंद्रपूर, दि. 15 : सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडील मारुती स्वीफ्ट डिझायर (क्र. एम.एच. – 12, ए.एच. 9131) या शासकीय वाहन निर्लेखन करून लिलावद्वारे विक्री करावयाचे आहे. त्यासाठी इच्छुक नोंदणीकृत व्यक्ती/ संस्था/डीलर यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर वाहन सद्यस्थिती नादुरुस्त असून 2012 चे मॉडल आहे.
अटी व शर्ती : लिलाव अर्ज नि:शुल्क असून कार्यालयातून प्राप्त करावा. अर्जासोबत बयाणा रक्कम 2 हजार रुपये, सह जिल्हा निबंधक वर्ग 1 चंद्रपूर यांच्या नावाने डिमांड ड्राफ्ट स्वरुपात जोडणे अनिवार्य आहे. बयाणा रक्कम विना परतावा राहील. रोखीने रक्कम स्विकारली जाणार नाही. वाहनाची पाहणी सुट्टीचे दिवस वगळून 12 मे ते 22 मे या कालावधीत कार्यालयीन वेळेत करता येईल. लिलाव अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 मे 2026 आहे. प्राप्त अर्ज 27 मे रोजी सकाळी 11 वाजता उघडण्यात येईल. लावण्यात येणारी बोली ही रक्कम 5 हजार किंवा त्याच्या पटीत असेल
निविदा सादर करण्याचा पता : सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल क. 4, पहिला मजला, चंद्रपूर. ई-मेल- jdrchandrapur@gmail.com
अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत वरील पत्त्यावर संपर्क साधावा, असे मुद्रांक जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment