Search This Blog

Tuesday, 19 May 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.19 :   सन 2025-26 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता अर्ज करण्यात आलेल्या, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज  त्रुटी मध्ये आहे, असे अर्ज 30 मे 2026 रोजी अपात्र करण्यात येणार आहे. करिता ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्जातील त्रुटीची पूर्तता केली नाही, अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्जातील त्रुटीची पूर्तता करून अर्जाची प्रत ऑनलाईन व ऑफलाईन रित्या (कागदपत्रासह) 30 मे  पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे.  

जे विद्यार्थी दि. 30 मे पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन रित्या अर्ज कार्यालयामध्ये सादर करणार नाही, असे विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी.

विद्यार्थ्यांची यादी या कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच या कार्यालयाचे वेबसाईट www.acswchandrapurin वर प्रसिद्ध करण्यात आल्याचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment