26, 27 व 28 मे रोजी शासकीय सहकार व लेखा पदविका परिक्षा
चंद्रपूर, दि. 20 : सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभगाच्या वतीने घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲन्ड ए.) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परिक्षा 26,27 व 28 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायं. 5 वाजेपर्यंत भवानजीभाई हायस्कूल, चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे.
ज्या परिक्षार्थ्यांनी 2026 च्या परिक्षेकरीता अर्ज केले आहेत, अशा परिक्षार्थींनी आपले ओळखपत्र युजर आयडी वरून काढून घ्यावे. ज्यांचे ओळखपत्र मिळाले नाही, अशा परिक्षार्थींनी आाधारकार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, कार्यालयाचे ओळखपत्र यापैकी एक दाखवून परिक्षेचे प्रोव्हिजनल ओळखपत्र जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयाकडून बनवून घ्यावे, असे जिल्हा उपनिबंधक जे.के. ठाकूर यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment