Search This Blog

Friday, 22 May 2026

भाडेतत्वावरील वाहनाकरीता 12 जून पर्यंत निविदा आमंत्रित


भाडेतत्वावरील वाहनाकरीता 12 जून पर्यंत निविदा आमंत्रित

चंद्रपूर, दि. 22 : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, चंद्रपूर येथील भाडेतत्वावरील वाहन लावण्याकरीताचे निविदापत्र (अटी व शर्तीसह) कार्यालयातून प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर निविदा 1 ते 12 जून पर्यंत कार्यालयातील सिलबंद निविदा पेटीत टाकाव्या. 15 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजता निविदा उघडण्यात येईल. सदर निविदा प्रक्रियासंबंधी वरिष्ठांच्या आदेशानुसार बदल करण्याचे/निर्णयाचे सर्व अधिकार कार्यालय प्रमुखास आहेत. अधिका माहितीकरीता वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, प्रशासकीय इमारत, गाळा क्र. 1516, चंद्रपूर येथे संपर्क करावा, असे वरिष्ठ भुवैज्ञानिक लीना धवन बारहाते यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment