अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी साहित्य वितरण शिबिरांचे आयोजन
चंद्रपूर, दि. 20 : जिल्हयातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तीसाठी कृत्रिम हात-पाय, कॅलीपर्स यांचे मोजमाप करून तात्काळ वितरणासाठी ‘ऑन-दि-स्पॉट’ शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. एस.आर. ट्रस्ट, मध्यप्रदेश व एलिम्को, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच चंद्रपूर जिल्हा प्रशासन, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, पंचायत समिती व दिव्यांग कौशल्य विकास संस्था, चंद्रपूर यांच्या सहकार्याने सदर शिबिरांचे आयोजन होणार आहे.
असे आहे शिबिरांचे वेळापत्रक : 1 ) 25 मे रोजी गोंडपिपरी पंचायत समिती येथे, 2) 26 मे रोजी बल्लारपूर पंचायत समिती, 3) 28 मे रोजी राजुरा पंचायत समिती, 4) 29 मे रोजी जिवती पंचायत समिती, 5) 30 मे रोजी कोरपना पंचायत समिती, 6) 1 जून रोजी चंद्रपूर पंचायत समिती, 7) 2 जून रोजी पोंभूर्णा पंचायत समिती, 8) 3 जून रोजी सावली पंचायत समिती, 9) 4 जून रोजी मुल पंचायत समिती, 10) 5 जून रोजी सिंदेवाही पंचायत समिती, 11) 6 जून रोजी नागभिड पंचायत समिती, 12) 8 जून रोजी ब्रम्हपूरी पंचायत समिती, 13) 9 जून रोजी चिमूर पंचायत समिती, 14) 10 जून रोजी वरोरा पंचायत समिती, आणि 15) 11 जून रोजी भद्रावती पंचायत समिती, येथे शिबिरांचे आयोजन होणार आहे. वरील सर्व शिबीर हे संबंधित तालुक्यांच्या पंचायत समितीमध्ये सकाळी 11 ते 4 या वेळेत आयोजित केले आहे.
आवश्यक कागदपत्रे : अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींने शिबिराचा लाभ घेण्याकरीता यु.डी.आय.डी. प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला या आवश्यक कागदपत्राची 2 प्रती झेराक्स घेवून उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी वैदयकीय सामाजिक कार्यकर्ता संजय पेच (7020328769) व अशासकिय सदस्य निलेश पाझारे (8806713386) यांच्याशी संपर्क साधावा, असे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment