Search This Blog

Friday, 8 May 2026

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करा


जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करा

Ø पालकमंत्र्यांच्या पोलीस अधिक्षकांना सूचना

चंद्रपूरदि. 08 : चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावीतसेच वाढत्या अपघाताला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस विभागाने ठोस उपाययोजना कराव्यातअशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक आयुश नोपानी यांना दिल्यायावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते.

चंद्रपूरमध्ये अवैध धंदे व गुंडागर्दी खपवून घेतल्या जाणार नाहीकायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्या नागरिकांवर त्वरित पोलिस विभागाने कारवाई करावीयाबाबत कोणतीही हयगय करू नयेचंद्रपूर शहरात गत तीन-चार दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचा बळी गेला आहेहे अतिशय दुर्दैवी आहेशहरातून जड वाहनांची अनिर्बंध पद्धतीने वाहतूक होत असल्यास तात्काळ त्यावर कारवाई करावीअशा सुचना पालकमंत्री डॉवुईके यांनी दिल्या.

००००००

No comments:

Post a Comment