Search This Blog

Monday, 18 May 2026

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’



 जिल्ह्यातील 187 गावांमध्येजन भागिदारी अभियान

Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन

चंद्रपूर, दि. 18 : अनुसूचित जमातींच्या सामाजिक व आर्थिक उत्कर्षासाठीप्रधानमंत्री जनजातीय न्याय अभियानआणिधरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानयांचे एकत्रिकरण करून केंद्र शासनाच्यावतीनेआदि कर्मयोगी अभियानराबविण्यात येत आहे. आदि कर्मयागी अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 187 गावांमध्ये आदि सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून या गावांमध्ये आताजन भागिदारी अभियानराबविण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी 18 ते 25 मे 2026 या कालावधीत सदर गावांमध्ये विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 18) बैठक घेऊन सदर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, गिरीश धायगुडे, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे आदी उपस्थित होते.

जन भागिदारी...सर्वात दूर, सर्वात पहिलेया संकल्पनेवर आधारीत, जिल्ह्यातील 187 गावांमध्ये 19 ते 25 या कालावधीत गाव पातळीवर व्यापकता शिबिरे व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येईल. 20 मे रोजी संबंधित अधिकारी कर्मचारी, आदि कर्मयागी व स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन शिवार फेरीचे आयेाजन, 21 मे 23 मे या कालावधीत आदि सेवा केंद्राकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण आणि जलद निपटा-यासाठी दररोज सुनावणी, 24 मे रोजी दस्तऐवजीकरण व विविध प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच 25 मे रोजी अभियानात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे, याबाबत नियोजन करण्यात आल्याचे सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत म्हणाल्या, आजपासून सुरू झालेले जन भागिदारी अभियान, आपापल्या क्षेत्रातील गावांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात यावे. संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर यंत्रणांनी आठवड्याभराचे नियेाजन करावे. विशेष शिबिरांचे आयोजन करून घरकुल, पट्टे वाटप, राशन कार्ड सोबतच अग्रीस्टॅक व फार्मर आयडीबाबतही मार्गदर्शन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

जन भागिदारी अभियानाचे उद्दिष्ट्ये : 1) आदि सेवा केंद्र असलेल्या 187 गावांमध्ये योजनांची माहिती पोहचविणे 2) ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, बचत गट यांच्या माध्यमातून जनजागृती 3) लाभार्थ्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन 4) तक्रार निवारण आणि हक्कांबाबत जागरुकता 5) आदि सेवा केंद्रात प्राप्त झालेल्या तक्रारींची जनसुनावणी व निवारण 6) आरोग्य तपासणी, सिकलसेल जागरुकता, पोषण संदेश 7) राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पोर्टलवर अपडेट करणे.

०००००००

No comments:

Post a Comment