Search This Blog

Monday, 18 May 2026

औषधी दुकानांच्या संपकाळात रुग्णांची गैरसोय टाळण्याकरीता उपाययोजना

 

औषधी दुकानांच्या संपकाळात रुग्णांची गैरसोय टाळण्याकरीता उपाययोजना

Ø औषधांसाठी संपर्क करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 18 : ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या 20 मे रोजी ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने, संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभुमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.

संपाच्या कालावधीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तालुकानिहाय काही औषधी दुकाने सुरू राहतील, याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी खालील व्यक्तिंशी संपर्क करावा.

चंद्रपूर : बंटी घाटे (मो. 9604789005), जितेंद्र राजा (मो. 9850378781), प्रशांत जाजू (मो. 9422136075), आकाश येरगुडे (मो. 9021974393), सुमीत बावणे (मो. 9420659964), विनय सबनीस (मो. 9422837633). घुग्घुस : गंधर्व भगत (मो. 9922517194), बल्लारपूर : निशीकांत खैरे (मो. 9422139388), राजुरा : कैलास रेंगुटवार (मो. 9270122185), कोरपना : लक्ष्मीकांत देवतडे (मो. 9545667783), जिवती : मोहमद देशमुख (मो. 9881013685), पोंभुर्णा : विजयपाल पिपरे (मो. 7875676215), गोंडपिपरी : रविंद्र सोनुले (मो. 9421718752), भद्रावती : अविनाश पारोदे (मो. 9850738755), वरोरा : मनिष पिंपळशेंडे (मो. 9420304403), चिमूर : अजय चौधरी (मो. 9421721256), मूल : मनिष येलट्टीवार (मो. 9326109977), सिंदेवाही : राजेंद्र पशीने (मो. 9423608223), सावली : गजानन टोंगे (मो. 9422191804), नागभीड : विजय बोरकर (मो. 9423638561), ब्रम्हपुरी : सुरेश अटवार (मो. 9423642205).

आणिबाणीच्या प्रसंगी औषधांची आवश्यकता भासल्यास रुग्णांनी तथा त्यांच्या नातेवाईकांनी सहायक आयुक्त (औषधे) सुहास सावंत (मो. 8600026385) आणि औषध निरीक्षक नालंदा उरकुडे (मो. 9096414104) यांच्याशी संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त श्री. सावतं यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment