Search This Blog

Monday, 18 May 2026

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Ø वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाकरीता 18 जून रोजी मतदान

चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे सदस्य निवृत्त झाल्यामुळे, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार - वर्धा - चंद्रपूर गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतर्गत 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम : 1) अधिसूचनेची प्रसिद्धी - 25 मे 2026, 2) नामनिर्देशनपत्र स्विकारण्याची अंतिम तारीख - 1 जून 2026, 3) नामनिर्देशन पत्राची छाननी - 2 जून रोजी, 4) उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख - 4 जून रोजी, 5) मतदानाचा दिनांक - 18 जून 2026 रोजी, 6)  मतदानाची वेळ - सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, 7) मतमोजणी दिनांक - 22 जून रोजी, 8) निवडणूक प्रक्रिया संपुष्टात येण्याची तारीख - 25 जून 2026 आहे.

भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमांनुसार वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, चंद्रपूर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 1) निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर, 2) निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा, 3) निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली आहेत.

वरील निवडणूक प्रक्रियेअंतर्गत उपरोक्त तिन्ही जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या एकूण 40 स्थानिक स्वराज्य संस्थेतील 977 पात्र मतदार, मतपत्रिकेद्वारे आपले मतदान नोंदविणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment