Search This Blog

Wednesday, 20 May 2026

महाटेट परिक्षेच्या गुणपत्रिका घेऊन जाण्याचे आवाहन

 

महाटेट परिक्षेच्या गुणपत्रिका घेऊन जाण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 20 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटेट) 25 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर परिक्षेतील पेपर क्रमांक 1 (इयत्ता 1 ली ते 5 वी स्तर) व पेपर क्रमांक 2 (इयत्ता 6 वी ते 8 वी स्तर) चा अंतिम निकाल 3 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात आला. या परिक्षेचे अंतिम गुणपत्रक जि.. शिक्षणाधिकारी (प्राथ) कार्यालयास प्राप्त झाले आहेत.

संबंधितांनी गुणपत्रिका प्राप्त करून घेण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेश पत्र, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत, डी.टी.एङ उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एङ उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा, ओळखपत्र (आधार कार्ड / पॅनकार्ड/ चालक परवाना/ निवडणूक ओळखपत्र) यांची मूळ प्रत व झेरॉक्स प्रत सोबत आणाव्यात, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी केळकर यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment