ज्ञान भारतम् प्रकल्पांतर्गत पुरातन हस्तलेखन होणार जतन
चंद्रपूर, दि.21 : ज्ञान भारतम् प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय हस्तलिखीत सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत असून सदर अभियान हे भारताच्या समृध्द हस्तलिखीत वारसाचे जतन, संवर्धन तसेच दस्तऐवजीकरण करण्यासाठी राबविण्यात येणारा एक महत्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम आहे.
पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांनी दिलेल्या 'ज्ञान भारतम् तसेच संस्कृती, मंत्रालय भारत सरकार यांनी उपलब्ध करून दिलेल्या वापरकर्ता मार्गदर्शिकेनुसार देवस्थान / न्यास/ संस्थांकडे उपलब्ध असणाऱ्या हस्तलिखितांची माहिती ज्ञान भारतम् मोबाईल ॲपमध्ये नोंदविण्याच्या सुचना विश्वस्तांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच 'ज्ञान भारतम्' पोर्टलवर नमूद केल्याप्रमाणे ऐतिहासिक व धार्मिक स्वरूपाचे प्राचिन साहित्य, जसे की, हस्तलिखिते, पोथ्या, पुराणे व इतर तत्सम यांची डिजिटल स्वरूपात नोंद संबंधित देवस्थान/न्यास/संस्थांनी 'ज्ञान भारतम्' पोर्टलवर करावयाची आहे.
या अनुषंगाने संबंधित धार्मिक स्थळांचे विश्वस्त, संस्था, मठ, मंदिरे वाचनालये तसेच हस्तलिखिते जतन करणाऱ्या व्यक्ती/संस्थांनी उपलब्ध हस्तलिखितांची माहिती 'ज्ञान भारतम्' पोर्टल / मोबाईल ॲप वर नोंदवावी. सदर साहित्याचे जतन, संवर्धन व संरक्षण होणाच्या दृष्टीने संबंधित विश्वस्तांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. पोर्टलवर नोंदणी करताना कोणताही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित साहित्याच्या माहितीसह सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, चंद्रपूर यांच्यासोबत संपर्क साधावा, जेणेकरून सदर साहित्याची योग्य प्रकारे नोंद घेता येईल, असे सहायक धर्मादाय आयुक्त किशोर वानखेडे यांनी कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment