Search This Blog

Tuesday, 19 May 2026

22 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

22 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

चंद्रपूर, दि.19 :   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि मॉडल करिअर सेंटर, चंद्रपूर या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने दुसऱ्या व चवथ्या शुक्रवारी प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत 22 मे 2026 सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, चंद्रपूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 10 वी 12 वी इत्यादी युवक व युवतींकरीता बँकिंग अॅन्ड  इंन्सूरन्स क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने सदर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी दोन प्रती) उपस्थित राहावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-252295  येथे संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी संदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment