Search This Blog

Friday, 8 May 2026

कंपनीच्या फायद्यापेक्षा शेतक-यांचे हित महत्वाचे - पालकमंत्री डॉ. अशोक वुईके



कंपनीच्या फायद्यापेक्षा शेतक-यांचे हित महत्वाचे पालकमंत्री डॉअशोक वुईके

Ø बेलोराजेनापानवडाळा येथील पुनर्वसनभुसंपादन व इतर समस्यांबाबत आढावा

चंद्रपूरदि. 08 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहेविविध कंपन्या येथे येऊन व्यवसाय करतातमात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेतातत्यांनाच वाऱ्यावर सोडत असल्याचे निदर्शनास आले आहेशेतकऱ्यांची जमीन प्रकल्पासाठी घेतली असल्यास त्यांचे योग्य पुनर्वसन आणि स्थानिकांना रोजगार देणे हे कंपनीचे कर्तव्यआहेमात्र याबाबतीत शेतकऱ्यांची लूट होत असेलतर खपवून घेतल्या जाणार नाहीअसा इशारा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिला.

अरबिंदो कोल माईन्समुळे प्रभावित बेलोराजेनापानवडाळा व इतर 11 गावांतील पुनर्वसनभुसंपादन तसेच नागरी समस्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आलीयावेळी ते बोलत होतेबैठकीला जिल्हाधिकारी वसूमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहवरोऱ्याचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्केउपजिल्हाधिकारी अतुल जटाळे (पुनर्वसनसंजय पवार (भुसंपादन), जिल्हा खनीकर्म अधिकारी वसीम सय्यदतहसीलदार राजेश भांडारकरवरोराचे पोलिस उपअधिक्षक संतोष बाकलअरबिंदो कंपनीचे उपाध्यक्ष संजीवा रावसहउपाध्यक्ष व्यंकट रेड्डीसहाय्यक महाव्यवस्थापक रमेश वाकडेअजय सिंग यांच्यासह गावकरी प्रवीण ठेंगणेजनाचे सरपंच प्रभा बोढालेउपसरपंच हरिश्चंद्र आसुटकरहेमेंद्र धानोरकर व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉवुईके म्हणालेगावक-यांच्या पुनर्वसनाबाबत कंपनीने कालमर्यादा ठरवून ठराविक वेळेत पुनर्वसन व इतर नागरी समस्यांची सोडवणूक करावीकंपनीने प्रकल्पासाठी काही जमीन विकत घेतली आहे व उर्वरित जमीन अद्यापही घ्यायची आहेफसवेगिरी करून व्यवसाय करत असालतर खपवून घेणार नाहीशेतकऱ्यांचे हित हे महत्त्वाचे आहेकंपनीत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजेज्यांना रोजगार दिला आहेत्यांची यादी आधारकार्ड सह जिल्हा प्रशासनाला सादर करावीशेतकऱ्यांच्या संयमालासुद्धा मर्यादा आहेत्यामुळे कंपनी शेतकऱ्यांचे नुकसान करू नयेअसे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिले

गावक-यांनी मांडल्या समस्या : यावेळी गावकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्यायात जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कंपनीने कोळसा उत्खनन करू नयेकंपनीने मुख्य मार्ग तोडला आहेप्रकल्पासाठी जमीन घेत असाल तर सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजेनोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे.

०००००

No comments:

Post a Comment