Search This Blog

Thursday 10 November 2022

कृषी पंपांना होणार दिवसा 12 तास वीज पुरवठा

 चंद्रपूरगडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात



कृषी पंपांना होणार दिवसा 12 तास वीज पुरवठा

Ø मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्र्यांना केलेली विनंती मान्य

Ø लवकरच होणार आदेश निर्गमित

मुंबई / चंद्रपूर, दि. 10 : मानव - वन्‍यजीव संघर्ष तसेच वन्यप्राण्यांच्या हल्‍ल्‍यात जाणारे नागरिकांचे बळीत्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धास्तावलेला शेतकरी वर्ग, ही परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूरगडचिरोली व गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे विज भारनियमन रद्द करून सकाळी 6 ते सायं. 6 या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्‍यात येईलअशी घोषणा राज्‍याचे वनेसांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली. उपमुख्‍यमंत्र्यांनी यासंबंधी तात्काळ सकारात्‍मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले आहेत.

या जिल्ह्यांमध्ये दुपारच्‍या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन करण्‍यात येत असल्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी शेतकरी संबंधित कामांसाठी शेतात जातात. अशा वेळी वन्‍यप्राण्‍यांच्‍या होणा-या हल्‍ल्‍यात शेतक-यांचे बळी जाण्‍याचा घटना जिल्‍हयात मोठया प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे सद्या रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना भेटून विनंती केली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर व गोंदिया जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्‍यांना दिवसा कृषी पंपांना वीज पुरवठा करण्‍याची विनंती केली व त्‍यांनी  ही विनंती तात्‍काळ मान्‍य केली. याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून या माध्‍यमातून चंद्रपूरगडचिरोली व गोंदिया जिल्‍हयातील शेतकरीशेतमजूर बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

००००००

No comments:

Post a Comment