प्रलंबित वेतननिश्चिती पडताळणीसाठी विशेष मोहीम
Ø 6 ते 9 डिसेंबर कालावधीत जिल्हा कोषागार येथे आयोजन
चंद्रपूर दि. 10 : प्रलंबित वेतननिश्चिती प्रकरणांची पडताळणी करण्यासाठी कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे 6 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
वेतन पडताळणी शिबिरामध्ये चंद्रपूर कोषागार व उपकोषारामधून तात्पुरते निवृत्ती वेतन घेणारे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रकरणे, तसेच 30 सप्टेंबर 2022 पूर्वी सेवानिवृत्त झालेले तथापि वेतन पडताळणी प्रलंबित असलेले कर्मचारी, आणि 31 मार्च 2023 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके वेतन पडताळणीकरीता सादर करावयाची आहे.
जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन निश्चितीची पडताळणी करून सदर विशेष माहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन कोषागार अधिकारी प्रफुल वडेट्टीवार यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment