मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी
प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीर
Ø 19 व 20 नोव्हेंबर
तसेच 03 व 04 डिसेंबर रोजी आयोजन
चंद्रपूर, दि. 17 : विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी प्रत्येक
मतदान केंद्रावर 19 व 20 नोव्हेंबर तसेच 03 व 04 डिसेंबर 2022 या दोन्ही शनिवार व रविवारी
विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरीकांना सदर शिबिरात नवीन मतदार नोंदणी करणे, मतदार ओळखपत्र आधार
कार्डशी जोडणी करणे, मय्यत, स्थलांतर व दुबार मतदारांची वगळणी करता येईल. तसेच 09 नोव्हेंबर
रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीची तपासणी करून मतदार यादीवर काही आक्षेप असल्यास त्यांचे दावे
व हरकती देखील शिबिरात स्विकारण्यात
येणार आहे.
तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन
सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार
निलेश गौंड यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment