Search This Blog

Monday 14 November 2022

बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव 31 डिसेंबर पर्यंत सादर करावे

 

बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव

31 डिसेंबर पर्यंत सादर करावे

Ø चंद्रपुर, बल्लारपुर व भद्रावती तालुक्यातील महाविद्यालयातील प्राचार्यांसाठी 15 नोव्हेंबरला कार्यशाळा

चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव आपल्या महाविद्यालयामार्फत 31 डिसेंबर पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे सादर करावा, असे आवाहन समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

            जिल्ह्यातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थी संख्या एकुण 7802 आहेत. त्यापैकी एकुण 5145 विद्यार्थ्यांचे प्रकरणांत जात वैधता प्रमाणपत्र निकाली काढण्यात आलेले आहेत. तसेच अपुर्ण दस्तऐवजामुळे त्रुटीमध्ये असलेल्या 350 प्रकरणांना ई-मेल संदेशाद्वारे व त्रुटीचे पत्राद्वारे त्रुटीपुर्तता करणेबाबत कळविले आहे.

इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्यांची जात पडताळणी पुर्ण झाल्यानंतर या सत्रामध्ये 11 वी विज्ञान शाखेमध्ये शिकणारे विद्यार्थी तसेच विज्ञान प्रवर्गाव्यतीरिक्त व व्यावसायीक अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी संबंधीत उपविभागीय अधिकारी यांचे कडुन जात प्रमाणपत्र काढणेबाबतची कार्यवाही करावी व जात प्रमाणपत्र पडताळणी करीता आवश्यकत दस्तऐवज तयार करुन ठेवावे.

जिल्ह्यातील चंद्रपुर, भद्रावती व बल्लारपुर तालुक्यातील इयत्ता 12 वी विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य अथवा संबंधीत जबाबदार कर्मचाऱ्यांची दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता, सामाजिक न्याय भवन, शासकीय दुध डेअरी जवळ, चंद्रपुर येथे कार्यशाळा आयोजीत करण्यात आलेली आहे. त्यांनी कार्यशाळेस येतांना आपल्या महाविद्यालयातील इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेत एकुण प्रवेशित विद्यार्थी संख्या, जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज दाखल केलेल्या व न केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या परीपुर्ण माहितीसह कार्यशाळेकरीता उपस्थित राहावे, असे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी कळविले आहे.

००००००


No comments:

Post a Comment