Search This Blog

Friday 4 November 2022

‘हर हर महादेव’ सिनेमाचा विशेष शो राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळांतील सदस्यांसाठी आयोजित करणार


 

हर हर महादेव’ सिनेमाचा विशेष शो राज्यपालमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळांतील सदस्यांसाठी आयोजित  करणार

Ø सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 मुंबई / चंद्रपूरदि.4 : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला ‘हर हर महादेव’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुढील आठवडयात या सिनेमाचा विशेष शो राज्यपाल भगत सिंह कोश्यारीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य मंत्रीआमदार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 हर हर महादेव सिनेमाची टीम गुरुवारी मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी आली होती. हरहर महादेव सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे सुबोध भावेनरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे शरद केळकरसिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडेसिनेमाचे निर्माते सुनील फडतरेझी स्टुडिओचे प्रमुख मंगेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

 यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरातील सिनेमागृहात एकाच वेळी हा सिनेमा दाखविण्याचे नियोजन करण्यात येईल. तरुण पिढीला विशेषत: शालेय विद्यार्थ्यांसाठी या विशेष शोचे आयोजन करण्याबाबत विचार सुरू आहे.

 झी स्टुडिओजची निर्मिती असलेला मराठीसह हिंदीतमिळतेलुगूकन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या सिनेमाला एकात्मिक वस्तू/माल आणि सेवा कर यामधून सुट देता येईल का, याबाबतही तपासले जाईल, असे त्यांनी सांगितले.

०००००००

No comments:

Post a Comment