Search This Blog

Sunday 27 November 2022

विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही - सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन










 

विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही

- सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

Ø मृद्गंध पुरस्कारांचे वितरण

मुंबई/ चंद्रपूर दि. 27 : शाहिर विठ्ठल उमप यांनी आपल्या शाहिरीतून समाजात निर्माण केलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी निर्माण करू शकत नाहीअसे प्रतिपादन वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 12 व्या शाहिर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहाच्या वेळी मृद्गंध पुरस्कार 2022 चे वितरण करतांना ते बोलत होते.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात फ.मुं. शिंदेरवींद्र साठेडॉ.रवींद्र कोल्हेडॉ.स्मीता कोल्हेसंजय मोनेसुकन्या मोनेकमलाबाई शिंदेश्रेया बुगडे यांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित केले गेले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तपद्मभूषण उस्ताद राशीद खॉंसाहेबआशीष शेलारपराग लागूनंदेश उमप मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले कीआज ज्यांना मृद्गंध पुरस्कार दिला गेलाय त्या सर्व व्यक्ती कर्तृत्वाने हिमालयाएवढ्या मोठ्या आहेत. त्यांना पुरस्कार द्यायला मिळणे हाच माझ्याकरता एक मोठा पुरस्कार आहे. इथे या सर्व लोकांच्या मनोगतातूनगायनातून या कार्यक्रमाची उंचीही प्रचंड वाढली आहे. राजकारणात तीरस्कारालाही तोंड द्यावे लागते मात्र या मंचावर येऊन जो आनंद मिळाला तो अवर्णनीय आहे.

यावेळी प्रत्येक सत्कारमूर्तीने आपले मनोगत व्यक्त केले. आमदार आशीष शेलार यांचेही यावेळी भाषण झाले.

000000

No comments:

Post a Comment