Search This Blog

Wednesday, 23 November 2022

पोंभुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी 2.50 कोटींचा निधी मंजूर


 

पोंभुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी 2.50 कोटींचा निधी मंजूर

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलीत

चंद्रपूर, दि. 23 : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा तालुका कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी 2 कोटी 50  लक्ष रु निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत सदर कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी 22 नोव्हेंबर 2022 रोजीच्या आदेशानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

पोंभुर्णा पोंभुर्णा तालुक्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. या तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती विषयक कामांसाठी सतत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जावे लागते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. स्वतंत्र इमारत बांधकामासंदर्भात शेतकरी बांधवांनी पालकमंत्री श्री मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. श्री. मुनगंटीवार यांनी कृषी अधिकारी कार्यालय बांधकामासाठी निधी तातडीने मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन शेतक-यांना दिले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून त्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीच्या माध्यमातून आता प्रशासकीय कामकाज वेगाने होण्याचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे.

००००००

No comments:

Post a Comment