विधी सेवा प्राधिकरणद्वारे चांदा पब्लिक स्कूलमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबीर
चंद्रपूर, दि. 7 : राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांचे सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधीसेवा प्राधिकरणद्वारे चांदा पब्लिक स्कूल येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश – 3, अनिता नेवसे तर मंचावर सचिव सुमित जोशी, चांदा पब्लिक स्कूलच्या संचालक स्मिता जीवतोडे, मुख्याध्यापिका आम्रपाली पडोले आदी उपस्थित होते.
विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. जोशी यांनी कार्यक्रमाचा हेतु व उद्देश सांगितला तसेच प्राधिकरणाबाबत मोफत विधी सहाय्य कोणाला मिळू शकते, याबाबत मार्गदर्शन केले. मुजावर अली यांनी सायबर क्राईम या विषयावर माहिती दिली. तर न्यायाधीश नेवसे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याबाबत व त्यातील सुधारणेबाबत मार्गदर्शन केले. तसेच बालकांनी स्वत:चे संरक्षण कसे करावे आणि शाळा व्यवस्थापनाची व पालकांची काय जबाबदारी आहे, याबाबत अवगत केले.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
००००००००
No comments:
Post a Comment