भरडधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत बियाणे वाटप
चंद्रपूर, दि. 10 : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वरोरा येथे पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत भरडधान्य विकास कार्यक्रम सन 2022 - 23 अंतर्गत बियाणे वाटप आमदार प्रतिभा धानोरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या उपस्थितीत कळमगव्हाण व करंजी येथील निवडक लाभार्थ्यांना ज्वारी बियाणे रेवती वाणचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना श्री. बऱ्हाटे यांनी शेतकऱ्यांना उकिरडा मुक्त गाव या संकल्पनेनुसार नॅडेपकंपोस्ट अंतर्गत पोस्ट खतांचे टाके तयार करणे, रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे, सोबतच ज्वारी, मसूर व जवस सारख्या पिकांचे पेरणी क्षेत्र वाढविणे आणि म.ग्रा.रा.रो.ह.यो. अंतर्गत फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण इ. महत्वाच्या योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. उ
उपस्थित शेतकऱ्यांनी तालुक्यातील जंगलाजवळच्या क्षेत्राप्रमाणेच इतर क्षेत्रासाठी सौर उर्जेवर आधारित कुंपणाची योजना मिळावी अशी मागणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी गजानन भोयर यांनी केले. तर आभार मंडळ कृषी अधिकारी घनश्याम पाटील यांनी मानले. यावेळी कृषी पर्यवेक्षक गजेंद्र पुसदेकर, संजय कोसुरकर व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
०००००००
No comments:
Post a Comment